मुंबई : सलमान खान, ईद आणि त्याचा चित्रपट हे समीकरण ठरलेले आहे. सलमान खान येत्या ईदला 'रेस 3' हा चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे. सलमान खानचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्सुक आहेत. 


 सलमान खानने केली अधिकृत घोषणा   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सलमान खानने 'रेस 3' चित्रपटाच्या ट्रेलरची रीलिज डेट आज घोषित केली आहे. 15 मे रोजी 'रेस 3' चा ट्रेलर येणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. सोबतच त्याने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'रेस 3' चा ट्रेलर तयार नसल्याने तो रीलिज होण्यास उशीर होत आहे अशी कबुली सलमान खानने दिली आहे. मात्र जेव्हा येईल तेव्हा तुम्हांला तो आवडेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.  



 रेस 3 असणार खास  


 रेस या चित्रपटाची तिसरी सीरिज 'रेस 3' मध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी सैफ अली खानने या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत झळकला होता. आता रेमो डिसुजा दिग्दर्शित 'रेस 3' मध्ये सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीस, अनिल कपूर, डेजी शहा, बॉबी देओल झळकणार आहे.