मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. चाहते 'राधे श्याम' सिनेमाची अक्षरक्षः प्रतीक्षा करत होते. सिनेमा प्रदर्शित तर झाला, पण चाहत्यांना मात्र सिनेमाने निराश केलं. प्रभासचा सिनेमा पाहाण्यासाठी चाहत्यांनी एडव्हान्स बुकिंग केली. सिनेमा प्रदर्शत होण्याआधी तो हीट ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला. पण तसं मात्र काही झालं नाही. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पहिल्या दिवाशी सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम' सिनेमाला समिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर काहींनी सिनेमा उत्तम असल्याची प्रतिक्रिया दिली. 



एक युजर कमेंट करत म्हणाला, 'सिनेमाचा पहिला भाग उत्तम आहे... दुसरा भाग पाहिल्यानंतर तिची निराशा होते.' बिग बजेट सिमेमा पाहिल्यानंतर अन्य एक युजर म्हणतो की, सिनेमात ड्रामा नाही, क्लाइमेक्स इत्यादी गोष्टींमुळे सिनेमा फेल ठरत आहे. 


दुसरीकडे चाहत्यांनी 'राधे श्याम' सिनेमाला क्लासिक सांगितलं आहे. सिनेमात व्हीएफएक्सपासून, स्टोरीलाईन आणि प्रभासच्या अभिनयाला उत्तम सांगितलं जात आहे. शिवाय सिनेमातील प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडली आहे.