मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री राधिका आपटे चित्रपटांची निवड आणि दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आपण तिला पाहीलंय. सध्या नेटफ्लिक्सच्या सिरिजमध्येही तिच्या अभिनयाचा दर्जा आपण पाहतोय. अभिनयासोबतच ती वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवरही बोलत असते. 2015 मध्ये राधिकाची न्यूड क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती. अनुराग कश्यपच्या 'मॅडली' शॉर्टफिल्ममधला हा सीन होता. त्यानंतर 2016 मध्ये तिच्या 'पार्च्ड' सिनेमातील कोस्टार आदिल हुसैनसोबतचा एक सीन व्हायरल झाला होता.


माझ्या आईकडून ऐकलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच तिने 'फीट अप विद द स्टार्स' या टॉक शोमध्ये या व्हायरल झालेल्या क्लिप्सबद्दल भाष्य केलं. मला या गोष्टीचा काही फरक पडत नाही असे तिने यावेळी सांगितले. मला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. 'मी सर्वात आधी या व्हायरल क्लिपबद्दल माझ्या आईकडून ऐकलं. तिला कोणीतरी या क्लिप्स पाठवल्या होत्या. दुसऱ्यावेळी माझ्या ड्रायव्हरकडून मी याबद्दल ऐकलं. आता लपवण्यासारखं काही राहिलं नाही. मी काहीही करु शकते आणि लोक माझ्याबद्दल बातम्या नाही बनवू शकतं.'


नवा सिनेमा 


राधिका सध्या राम माधवन यांच्या अंधाधुन सिनेमात काम करतेय. तिच्यासोबत अभिनेता आयुष्यमान आणि अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री असून आयुष्यमान खुराना एका अंधळ्या संगीतकाराच्या भूमिकेत आहे.