`या` चित्रपटानंतर राधिका आपटेला एडल्ट कॉमेडी सिनेमांच्या ऑफर; म्हणाली `तिला काही अडचण नाही पण...`
अभिनेत्री राधिका `मोनिका ओ माय डार्लिंग` या ओटीटी चित्रपटात दिसणार आहे.
मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो. अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिका ही राधिकाची ओळख. त्याला जोड मिळते ती म्हणजे तिच्या अभिनयाची.
शोर इन द सिटी, बदलापूर, मांझी - द माउंटन मॅन, पार्च्ड आणि रात अकेली या यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका 'मोनिका ओ माय डार्लिंग' या ओटीटी चित्रपटात दिसणार आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि चित्रपटांच्या निवडीबद्दल बोलताना राधिकाने मीडियाला सांगितलं की, 2015 मध्ये आलेल्या बदलापूर चित्रपटानंतर तिला दोन-तीन सेक्स कॉमेडी चित्रपटांच्या ऑफर आल्या.
या चित्रपटात विनय पाठक राधिकाच्या पतीच्या भूमिकेत होता. हा चित्रपट हिट ठरला होता. राधिकाने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, बदलापूरनंतर मला दोन-तीन सेक्स कॉमेडी चित्रपटांची ऑफर आली, ती मी नाकारली. मला सेक्स कॉमेडीमध्ये कोणतीही अडचण नव्हती, कारण तो सिनेमा हंटर (2015) सारखा चित्रपट असायला हवा. तसं, मला यापूर्वी बॉलीवूडमध्ये बनवलेले असे अनेक सेक्स कॉमेडी चित्रपट आवडले नव्हते, ज्यात महिलांना केवळ वस्तू म्हणून दाखवलं गेलं. ती पुढे म्हणाली की, मला असा ह्यूमर आवडत नाही. मी असे चित्रपट करू शकत नाही.
हवा स्ट्राँन्ग कंटेट
जेव्हा राधिकाला विचारण्यात आलं की, तिला ऑफर केलेला सेक्स कॉमेडी चांगली आहे की नाही हे ती कशी ठरवते. यावर ती म्हणाली की हे खूप सोपं आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यावर समजतं की, ती कोणत्या उद्देशाने लिहिली गेली आहे. यात कसले विनोद केले जातात? यावर कोणता चित्रपट बनणार? महिलांना हसवण्यासाठी अशी कॉमेडी केली जावी यात मला काही अडचण नाही, पण त्यामागे एक भक्कम कथा आणि तर्क असायला हवा, असे ती म्हणाली.