पहिल्या मासिक पाळीवर राधिका आपटेच्या घरी दिमाखदार पार्टी
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या पहिल्या मासिक पाळीविषयी मोठा खुलासा केला
मुंबई : भारतात अगदी सुरुवातीपासूनच महिलांच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल फार कमी चर्चा झाली आहे. जिथे आजही लोक मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलत नाहीत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये, लोक याबद्दल उघडपणे बोलू लागले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेनेही तिच्या पहिल्या पाळीविषयी मोठा खुलासा केला होता, ज्यामुळे ती चर्चेत आली होती. जेव्हा तिला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा तिचे कुटुंबिय तिच्याशी कसं वागले, हे राधिकाने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
राधिकाचा हा किस्सा 2018 वर्षातला आहे. जेव्हा राधिकाने तिच्या 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत हा संपूर्ण अनुभव शेअर केला होता. त्यावेळी सोनम कपूर आणि अक्षय कुमारही तिच्यासोबत तिथे होते. पीरियड्सवर राधिकाने सगळ्यात आधी तिच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया सांगितल्या. राधिकाची ही गोष्ट ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
राधिका म्हणाली, ''माझ्या घरात सगळेच डॉक्टर आहेत, या कारणामुळे माझ्या कुटुंबात याविषयी कोणतीच रूढी-परंपरांची चर्चा झाली नाही. ती पुढे म्हणाली की, मला त्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. पण जेव्हा मला पहिल्यांदाच पीरिएड्स आले तेव्हा मी खूप रडली''.
राधिका पुढे म्हणाली की, 'या शारीरिक बदलामुळे मी खरोखर खूप घाबरली होती, मात्र माझ्या आईने घरात एक मोठी पार्टी दिली होती, ज्यात आमचे नातेवाईक आणि मित्र परिवार आला होता''. राधिकाला पहिली पाळी आली म्हणून ब्रॅन्डेंड घड्याळ आणि बरीच गिफ्ट मिळाली होती.