मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेटफ्लिक्सच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसते. राधिका आपटे आपल्या सिनेमांबरोबरच नेटफ्लिक्सवरील कलाकृतीमुळे चर्चेत असते. राधिका आपटे आणि विक्रांत मैसी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या राधिका आपटे तिच्या लग्नावरील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रांत, राधिका आपटेला त्यांच्या लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विक्रांतने राधिका आपटेला प्रश्न विचारला की, तू लग्न का केलंस?' त्यावर राधिकाने उत्तर दिलं की,'लग्न केल्यावर मला विझा मिळेल याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा लग्न केलं.'  मला वाटतं यामध्ये कोणतं बंधन नाही. मी लग्नाचं समर्थन करत नाही. आणि या संस्थेवर विश्वासही ठेवत नाही. मात्र मी फक्त लग्न यासाठी केलं कारण मला विझा मिळणार होता. महत्वाचं म्हणजे आम्हाला एकत्र राहायचं होतं. 



राधिकाने लंडनमधील म्युझिशियन बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे. लग्नाच्या अगोदरही हे दोघं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहत होते.  विक्रांतने राधिकाला विचारलं की, तू आता कुठे आहेस? त्यावर राधिका म्हणते की, मी सध्या लंडनमध्ये आहे. मी विचारलं केला आहे की, या वर्षी मी काम करणार नाही. त्यामुळे यंदा राधिका आपल्या संसाराला वेळ देतेय असं म्हणायला हरकत नाही. 



राधिकाच्या सध्या आपल्या लग्नाच्या या विषयामुळे चर्चेत आहे.