मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या ऑफबीट अभिनायामुळे लोकप्रिय असणारी अभिनेत्री राधिका आपटे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. मांझी सिनेमातील तिच्या भूमिकेने अभिनयाचे नवीन रुप दाखवले. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीमुळे ती अनेकदा सोशल मीडियावरही ट्रोल होते.  हा तिचा बिनधास्त अंदाज एकदा कलाकाराला थप्पड मारण्यापर्यंत गेला होता. असे तिने का केले ? याचा खुलासा खुद्द राधिकाने केला आहे.


थप्पड मारण्याचा राधिकाचा किस्सा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा धूपिया टॉक शोमध्ये गप्पा मारताना तिने हा किस्सा शेअर केला. राधिकाने सांगितले की, सेटवर माझा पहिला दिवस होता. त्यावेळेस मी साऊथचा लोकप्रिय अभिनेत्यासोबत मी काम करत होते. तो तामिळ सिनेमा होता. त्याने हळूहळू माझ्या पायाला स्पर्श करायला सुरूवात केली. सुरूवातील मी लक्ष दिले नाही. मात्र त्याचे हे वागणे थांबले नाही. मग मला सहन झाले नाही आणि न राहून मी त्याला एक थप्पड लगावली. असे जरी असेल तरी राधिकाने त्या तामिळ स्टारच्या नावाचा खुलासा करण्यास मनाई  केली.


राधिकाबद्दल...


राधिकाने २०१२ मध्ये  प्रकाश राजच्या धोनी सिनेमातून तामिळ चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर तिने साऊथच्या अनेक सिनेमात काम केले. इतकंच नाही तर रजनीकांतसोबत तिने ब्लॉकबस्टर सिनेमा कबालीमध्ये एकत्र काम केले. यात तिने रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
राधिका आपटे, नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल इंडियन सीरीज सेकर्ड गेम्समध्ये दिसेल. यात तिच्यासोबत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीही असतील. काही दिवसांपूर्वीच ती पॅडमॅन या सिनेमात अक्षय कुमारसोबत झळकली होती.