Radhika Madan on Trolling: करीना कपूरसारखं दिसायला हवं अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते परंतु अशावेळी एका अभिनेत्रीला मात्र याचा फारच वाईट अनुभव आलेला आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. तिला अनेकदा तिच्या रूपावरून बरेच चिडवले गेले आहे. याविषयी तिनंच खुलासा केला आहे. राधिका मदन ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सध्या ती साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. 'इंग्रजी मीडियम' या चित्रपटातून ती पहिल्यांदा प्रेक्षकासमोर आली होती. त्यामुळे तिची फार चर्चा होती किंबहुना तिच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक करण्यात आहे. या चित्रपटातून ती अभिनेता इरफान खानसोबत दिसली होती. त्यानंतर शिद्दत हा तिचा सनी कौशलसोबतचा चित्रपट चांगलाच गाजला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी डिंपल कपाडियासोबतची 'सास बहू और फ्लेमिंगो' ही वेबसिरिजही प्रचंड गाजली होती. सध्या तिच्या एका मुलाखतीची जोरात चर्चा आहे. सध्या राधिका मदन ही फारच लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. परंतु आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी तिला बराच स्ट्रगल हा करावा लागला आहे. सुरूवातीच्या काळात तिला अनेक टोमणेही ऐकावे लागले होते. ती सुंदर दिसत नाही. त्याचसोबत तिची हनवटी विचित्र आहे त्यामुळे तिच्या रूपावरून तिला अनेक दूषणंही सहन करावी लागली होती. तिनं एका मुलाखतीतून सांगितले की कशाप्रकारे तिला यावरून टोमणे ऐकावे लागले आणि तिचा आत्मविश्वास कमी झाला होता. 


हेही वाचा : 11 वर्षांचा संसार मोडून 8 वर्षाच्या मुलाला एकटी सांभाळणार अभिनेत्री? चर्चांना उधाण


न्यूज 18 शी बोलताना तिनं याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की तिला असं वाटायचं की ती करीना कपूर इतकी सुंदर दिसते परंतु तिच्या सौंदर्यावरून तिला अनेक टोमणे ऐकावे लागले होते. राधिका म्हणाली की, मला असं सांगण्यात आले होते की मी सुंदर नाहीये आणि त्याचसोबत माझी हनवटीही वाकडी आहे. मी तेव्हा खूप सरप्राईज झाले होते कारण मला असं वाटायचं की मी करीना कपूरसारखी दिसते. लोकांना कदाचित ही गोष्ट पचनी पडत नसावी परंतु हिरा एका चांगल्या जौहरीला मिळतोच. 



ती हेही म्हणाली की आपल्यावर लिहून आलेली ती प्रत्येक गोष्ट वाचते. त्यावरून काही गोष्टी अशा समोर येतात ज्या पाहून तिलाही फार हसायला येते. ती म्हणते की ती स्वत: सिद्ध करायला कायमच तयार असते. त्यातून त्यावर काम करते. आपल्यात बदल आणते.