मुंबई : बॉलिवूडची नवीन स्टाईल आयकॉन राधिका मदन, स्वत:ला सिद्ध करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. एका सीरियलपासून सुरू झालेल्या राधिकाने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'मेरी आशिकी तुम से ही' या लोकप्रिय शोमधून तिने पदार्पण केलं. मात्र, बॉलिवूडचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. अभिनयाबरोबरच राधिकाची स्टाईलही कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावरुनही राधिका तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. तिने आपल्या लुकमध्ये काही बदल करून सर्वांना चकित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच राधिकाने सांगितलं की, कशाप्रकारे तिला तिच्या शेप वरुन बोललं गेलं एवढंच नाही तर तिला सर्जरी करण्याचाही सल्ला देण्यात आला होता. राधिकाने तिच्या संघर्षांचं वर्णन केलं आहे. ती म्हणाली, 'मी क्विन होती. मी खोडकर होती आणि कधीकधी गंमतीमध्ये लोकांच्या सायकलचे टायर पंक्चर करायची. माझ्याकडे एक युनिब्रो होता आणि मुलांनी माझं लक्ष वेधून घेणे खूप अवघड होतं परंतु मला याची पर्वा नव्हती, मला वाटलं की मी सुंदर आहे.'



ती म्हणाली, ''जेव्हा कोणी मला विचारयचं की तू मोठी झाल्यावर तुला काय करायचं आहे? तेव्हा मी म्हणायचे, मला लग्न करायचं आहे. वयाच्या 17व्या वर्षी मी एका टीव्ही शोसाठी ऑडिशन दिलं आणि तीन दिवसातच मी शूटिंगसाठी मुंबईत आले. हे कठीण होतं. खूप कठीण मला झोपायला वेळ मिळायचा नाही ज्यामुळे माझं वजन काही किलोने वाढलं.


राधिका पुढे म्हणाली, 'याच दरम्यान मी माझ्या रिप्लेसची अफवा ऐकली आणि या अफवांमुळे मला प्रेरणा मिळाली. आणि मी वर्कआऊटला सुरूवात केली. माझ्याकडे बर्‍याच टीव्ही ऑफर आल्या पण मी स्वत:ला म्हणाली, "तु फक्त 19 वर्षांची आहेस, जर तु आराम निवडलास तर तु यामध्येच अडकून पडालशील."


'म्हणूनच मी चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली परंतु मला सगळीकडून नकार मिळत गेले. मला सांगितलं गेलं की, मला एक शेप असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्जरी करावी लागेल. पण मला तर मी बरोबर वाटत होती. हे लोक कोण आहेत जे मला सांगतात की मी सुंदर नाही? जवळपास दीड वर्ष मला काम मिळालं नाही. अशा परिस्थितीत मला स्वतःबद्दल काही शंका असायच्या पण मला माहित होतं की प्रवास हा गंतव्य स्थानापेक्षा महत्त्वाचा आहे. म्हणून मी ऑडिशनचा आनंद घेऊ लागले. त्यानंतर लवकरच मी माझा पहिला चित्रपट नंतर इतरही प्रोजेक्ट देखील साईन केले.