2024 हे वर्ष बॉलीवूड, राजकारण, खेळ, बिझनेस वर्ल्ड या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. प्रत्येक क्षेत्रातील विविध कार्यक्रमांमुळे सेलिब्रिटींना गुगलवर भरपूर सर्च केल गेलंय पण अनेक दिग्गजांना मात देत अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंटने हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राधिका उद्योगपती विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची लेक आहे. अनंत अंबानी यांच्याशाी लग्नाच्या बातमी नंतर जरी राधिका मोठ्याप्रमाणावर ओळखली गेली असली तरी तिची तेवढीच ओळख नाही. राधिकाचं गुगलवर भरपूर सर्च केल जाण्याच कारण म्हणजे ती एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना असून, भारतीय उद्योगिनी सूध्दा आहे. तिने मुंबईतील श्री निभा आर्ट्स डान्स अकॅडमी येथे गुरू भावना ठक्कर यांच्याकडे भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण घेतलेले आहे. तिने जून 2022 मध्ये 'जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई' येथे आरंगेत्रम केले होत. याशिवाय ती परोपकारी उपक्रम आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे भाग घेते. 


याच वर्षी अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकले होते. राधिकाच अनंत अंबानीशी लग्न आणि लग्नातील कार्यक्रमांमुळे मोठया प्रमाणावर चर्चेत होती. हे लग्न 12 जुलैला मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये झालं. त्यांच्या लग्ना आधी याच वर्षी दोघांच जामनगर येथे 1 ते 3 मार्चला प्री-वेडिंगचा कार्यक्रम पार पडलं. या कार्यक्रमाला बॉलीवूड, हॉलीवूड, बिझनेस आणि खेळ विश्वातील ख्यातनाम सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नंतर अनंत आणि राधिकाचं 28 में ते 1 जूनला दुसरं प्री-वेडिंग कार्यक्रम झालं. मुख्यतः अंबानी कुटुंबियांनी हे लग्न खासगी ठेवले नाही. लग्नाची दिनांक, स्थळ, पोशाख, दागिने सर्वच मीडियीद्वारे प्रसिध्द केल. त्यासोबतच लग्न तीन-चार दिवसांच असूनही प्रत्याक लग्नकार्य थाटामाटात झाले. राधिकाने लग्नात 214 कोटींचा लेहेंगा परिधान केला हे सुध्दा चाहत्यांमध्ये आकर्शणाचा विषय होता. अनंत आणि राधिकाचा विवाह तीसरं luxurious wedding मानलं जात. अश्या प्रकारे राधिका वर्षभर लाईमलाइमटमध्ये होती. 


आगामी वर्ष सुरु होण्यापूर्वी एक यादी प्रदर्शित झाली आहे, ही यादी साल 2024 च्या गुगल वरील टॉप 10 मोस्ट सर्च पर्सनची आहे. यामध्ये राधिका मर्चेंटने मोठमोठ्या दिग्गजांना मात देत स्वतःची जागा बनवली आहे. या लिस्टमध्ये राधिका 8 व्या क्रमांकावर आहे.


 भारतातील सर्वात जास्त गुगल सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती


1. विनेश फोगाट
2. नितीश कुमार
3.चिराग पासवान
4. हार्दिक पांड्या
5. पवन कल्याण
6. शशांक सिंह
7. पूनम पांडे
8. राधिका मर्चेंट
9. अभिषेक शर्मा 
10. लक्ष्य सेन