Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती...

Sharad Pawar Net Worth 2024 In Rupees: शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस असून मागील सहा दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची एकूण संपत्ती कितीये ठाऊक आहे का?

| Dec 12, 2024, 07:47 AM IST
1/13

sharadpawarproperty

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांकडे घर, कॅश, दागिन्यांसहीत इतर संपत्ती नेमकी किती आहे जाणून घ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त

2/13

sharadpawarproperty

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. मागील 6 दशकांहून अधिक काळापासून महाराष्ट्रतील राजकारणातील प्रमुख नावांपैकी एक असलेले शरद पवार आज दिल्लीतील निवासस्थानी आहेत. शरद पवार दिल्लीतच आपला वाढदिवस साजरा करणार असून अनेक नेते त्यांची भेट घेतील असं सांगितलं जात आहे.  

3/13

sharadpawarproperty

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिताना काही मोठ्या नेत्यांची नावं घ्यावीच लागतील. अशाच नावापैकी एक नाव शरद पवारांचं आहे. अनेक दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे? त्यांच्याकडे सोनं किती आहे? बँक खात्यांमध्ये किती पैसे आहेत? किती जमीन त्यांच्याकडे आहे? यासंदर्भात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात...

4/13

sharadpawarproperty

बॅक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शाखेमध्ये शरद पवारांच्या नावावर 1 लाख 5 हजार रुपये आहेत. मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये पवारांच्या नावर 6 लाख रुपये आहेत. नवी दिल्लीमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शरद पवारांच्या खात्यावर 13 लाख 56 हजार रूपये आहेत. पीडीसीसी बँक, भवानी नगरच्या शाखेमध्ये शरद पवारांच्या नावावर 12 हजार रुपये आहेत. शरद पवारांच्या नावावर बँकेत एकूण 3 कोटी 16 लाख रूपये जमा आहेत. 

5/13

sharadpawarproperty

शरद पवारांनी जावई सदानंद सुळे यांच्याकडून 2 कोटींचं कर्ज घेतलं आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर कहरा डेव्हलपर्स अॅण्ड माइन्स प्रिवेटेडकडून 5 कोटींचं कर्ज घेतलं असून, एमएसईबी डिपॉजिटमधूनही 9 हजार आणि सुप्रिया इंटरप्रायझेसकडून 75 हजारांचं कर्ज घेतलं आहे.  

6/13

sharadpawarproperty

शरद पवार आणि त्यांच्या पत्नीबरोबरच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींकडे असलेल्या एकूण सोन्याचांदीची किंमत 88 लाख 65 हजारांहून अधिक आहे.   

7/13

sharadpawarproperty

बारामतीमधील मालेगावमध्ये 65 लाख 81 हजार किंमत असलेली जमीन शरद पवारांच्या नावावर आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर बारामतीमधील ढेकळवाडी येथे 65 लाख 16 हजार रुपये किंमतीची जमीन आहे.   

8/13

sharadpawarproperty

बारामतीमध्ये शरद पवारांच्या नावावर असलेल्या एनए प्लॉटची किंमत 50 लाख 47 हजारांहून अधिक असून पत्नीच्या नावावर मालेगावमध्ये असलेला एनए प्लॉट 41 लाख 24 हजारांहून अधिक किंमतीचा आहे.  

9/13

sharadpawarproperty

पुणे शहरामध्ये अमर अविनाश कॉर्परेट सिटीच्या पाचव्या मजल्यावर शरद पवारांचा 2850 वर्ग फुटांचं घर आहे. हा फ्लॅट त्यांनी 2002 मध्ये 88 लाख 68 हजारांना विकत घेतलेला. त्याची आजच्या घडीला किंमत 3 कोटींहून अधिक आहे.  

10/13

sharadpawarproperty

मालेगावमध्ये शरद पवारांचं 9000 वर्ग फुटांचं घर आहे. त्याची किंमत 2 कोटी 17 लाखांहून अधिक आहे. सदर माहितीपैकी बरीचशी माहिती ही पवारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आहे.   

11/13

sharadpawarproperty

शरद पवारांकडे जवळपास 30 हजारांची रोख रक्कम कायम असते. तर त्यांच्या पत्नीकडे 25 हजार रुपये रोख असतात. आप्तकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ वापरासाठी हे पैसे ठेवले जातात असं 'नेटवर्थ टुडे' या वेबसाईटने म्हटलं आहे.  

12/13

sharadpawarproperty

शरद पवारांच्या एकूण संपत्तीपैकी सर्वात मोठा वाटा हा त्यांनी कंपन्यांच्या वेगवेगळ्या शेअर्स आणि बॉण्ड्समध्ये केलेल्या गुंतवणुकीचा आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे वेगवेगळ्या कंपन्याचे शेअर्स असून या शेअर्सची एकूण किंमत 7 कोटी 46 लाख 24 हजारांहून अधिक आहे.  

13/13

sharadpawarproperty

आज 85 वा वाढदिवस असलेल्या शरद पवारांची एकूण संपत्ती ही 32 कोटींहून अधिक आहे.