मुंबई : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना किस करण्यावर आक्षेप आहे. ज्यांना पडद्यावर किसींग सीन देणं आवडत नाही. त्याचबरोबर इमरान हाश्मी बॉलिवूडमध्ये सीरियल किसरच्या नावाने प्रसिद्ध आहे. पण इमरान हाश्मीच्या नावाची अशीच बदनामी करण्यात आली आहे. मात्र  पडद्यावरचा खरा सीरियल किसर कोणीतरी वेगळाच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं बोलायचं झालं तर इमरान हाश्मीच्या ऐवजी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सीरियल किसर म्हणून ओळखला जायला हवा. आमिर खानने आतापर्यंत 14 अभिनेत्रींना किस केलं आहे. सीरियल किसर इमरान नसून आमिर खान आहे. आमिरने आत्ता पर्यंत कोणत्या चित्रपटात किसिंग सीन दिले आहेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत


आमिर खानने 'होली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1984 साली आमिरच्या पहिल्या चित्रपटात त्याने किसिंग सीन दिला होता. त्याने चित्रपटाची अभिनेत्री किट्टू गिडवानी हिला स्क्रीनवर किस केलं होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटापासून आमिरने लिपलॉकिंगची प्रतिमा तयार केली होती.



'कयामत से क़यामत तक' 1988 साली आलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातही आमिरने लिपलॉक सीन दिला होता. एका सीनमध्ये आमिर आणि चित्रपटाची अभिनेत्री जुही चावला यांच्यात किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता.


 'दिल' हा आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा हिट चित्रपट होता. 1990 मध्ये आलेल्या या चित्रपटात आमिर आणि माधुरीमध्ये किसिंग सीन दाखवण्यात आला होता. तेव्हा मोठ्या पडद्यावर चांगलाच बोलबोला झाला होता. दोघांचे किसिंग सीन खूप हिट झाला होता.



1992 मध्ये आलेला 'जो जीता वही सिकंदर'मध्ये आमिरच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. पण त्यावेळची हॉट अभिनेत्री पूजा बेदीसोबतचा लिपलॉक सीन चित्रपटात चांगलाच गाजला होता. या चित्रपटात ती आमिरची किसिंग पार्टनर बनली होती.


'अकेले हम अकेले तुम' आमिरचा हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होती. दोघांनी एका सीनमध्ये लिपलॉक केलं होतं. या जोडीने बाथटबमध्ये किसिंग सीन दिला होता.


आमिर खानचा आणखी एक चित्रपट 1995 साली आला, तो म्हणजे बाजी. या चित्रपटात आमिरने त्या काळातील सगळ्यात बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णीसोबत एक किसिंग सीन केला होता, जो खूप गाजला होता.


1996 मध्ये आलेला राजा हिंदुस्तानी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील आमिरची व्यक्तिरेखा खूप पसंत केली गेली होती. या चित्रपटात आमिरच्या नावावर सर्वाधिक वेळ किस करण्याचा विक्रम आहे. चित्रपटाच्या एका सीनमध्ये आमिरने करिश्मा कपूरला जवळ-जवळ 40 सेकंद किस केलं.



 1997 मध्ये आलेला इश्क हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटात आमिर खान आणि जुही चावला यांच्यात एक किसिंग सीन होता. याआधीही जुही आणि आमिरने चित्रपटात लिपलॉक सीन केले होते.


2009 साली आमिर खानचा चित्रपट 3 इडियट्स मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर हिट सिनेमा ठरला होता. या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा आजही लोकांना आवडते. त्याचवेळी, या चित्रपटात त्याने बेबो करीना कपूर खानसोबत एक किसिंग सीन दिला होता. या चित्रपटात त्याने किस करताना नाक कसं मध्ये येत हे सांगितलं होतं.


धूम 3 मध्ये कतरिना कैफ आणि आमिर खानचा लिपलॉक सीन तुफान गाजला होता. दोघांमध्ये किसींग दाखवण्यात आला होता.