मुंबई : बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये त्यांच्या कलेच्या आणि कौशल्याच्या बळावर नावारुपास येतात. तर, काही अभिनेत्री चर्चांच्या वर्तुळात येत एका वेगळ्याच प्रकारची प्रसिद्धी मिळवतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, करिष्मा शर्मा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिष्माही वेगवेगळे ट्रेंडस फॉलो करणाऱ्यांपैकीच एक.  'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये इंटिमेट सीनन धुमाकूळ घालणारी करिष्मा सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. 


सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय. त्यामुळे तिचे बोल्ड फोटो हा काही नवा विषय नाही, असं अनेकजण म्हणतील. 


पण, ज्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे, त्यानं आणि त्या फोटोसाठी करिष्मानं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. 


एका न्यूड फोटोशूटमुळे करिष्मानं सोशल मीडियावर अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत. 



जिथं तिच्या अंगावर फर असणारं एक कापड तेवढं दिसत आहे. रोखलेली नजर, कमनीय बांधा आणि त्यात भर टाकणारं तिचं सौंदर्य असे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 



तिच्या या फोटोंवर असंख्य कमेंट्सही येत आहेत. ही तर हद्द झाली, ईथपासून आता हेच बघायचं पाकी होतं अशा कमेंट करणाऱ्यांनी मात्र या फोटोशूटसाठी तिला निशाण्यावर घेतलं आहे.