मुंबई : ALT Balaji लवकरच त्यांची 'रागिनी MMS 2.2' ही वेब सीरीज घेऊन येत आहेत. नुकताच या वेब सीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याआधी या वेब सीरीजचं हॉट पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आलेल्या टीझरमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. निर्माती एकता कपूरचा ‘रागिणी एमएमएस २’ हा सिनेमा २०१४ मध्ये आला होता. या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमात सनी लिओनी मुख्य भूमिकेत होती. मात्र, यावेळी एकता वेब सीरीज घेऊन आली आहे. यात करिश्माचा हॉट अवतार बघायला मिळणार आहे. 



‘पवित्र रिश्ता’ आणि ‘मोहब्बते’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली करिश्मा शर्मा या वेब सीरीजमध्ये बोल्ड अंदाजात बघायला मिळणार आहे. या वेब सीरीजच्या बोल्ड पोस्टरमुळे ती आधीच चर्चेत आली आहे. आता या टीझरने वेब सीरीजबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकताही अधिक वाढणार आहे.