रणबीर-आलियासारखी नाही तर `राहा` कपूर कुटुंबातील `या` व्यक्तीसारखी दिसते, डोळे पाहून नक्कीच आली असेल आठवण
Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Raha First Photo: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लिटिल प्रिंसेस राहा कपूरची पहिली झलक दाखवली. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघांनी चाहत्यांना अतिशय खास ट्रिट दिली आहे. राहा नक्की कुणासारखी दिसते?
आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना त्यांची मुलगी राहाची झलक दाखवली. ख्रिसमसच्या निमित्ताने या सेलिब्रिटी जोडप्याने आपली मुलगी राहा हिची जगाला ओळख करून दिली आणि आता राहाची पहिली झलक पाहून चाहते वेडे झाले आहेत. राहाच्या क्यूटनेस, डोळे आणि चेहरा पाहून चाहते थक्क झालेत. आतापर्यंत या जोडप्याने आपल्या मुलीचे फोटो काढू नका असे खास आवाहन पापाराझीला केले होते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते स्वतःच चाहत्यांना राहाची झलक दाखवतील आणि आता अखेर आलिया-रणबीरने त्यांचे वचन पूर्ण केले आहे. राहा कपूरची पहिली झलक पाहिल्यानंतर तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. (फोटो क्रेडिट - विरल भयानी इन्स्टाग्राम)
राहा नेमकी कुणार सारखी दिसते अशी चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. आई आलिया भट्ट की वडील रणबीर कपूर याच्यासारखी असा अंदाज व्यक्त केला जातोय. आलिया आणि रणबीरने राहाला बाहेर घेऊन येताच उपस्थित असलेले पॅप्सही आश्चर्यचकित झाले. राहाची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते रणबीर-आलियाच्या मुलीचे कौतुक करताना थकत नाहीत. विशेषत: राहाचे हलके निळे डोळे चर्चेचा विषय बनले आहेत.
राहाचा फोटो पाहिल्यानंतर ती कोणासारखी दिसते याची सर्वत्र चर्चा आहे. स्टारकिडची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, राहाचा चेहरा तिच्या आई-वडिलांसारखा नसून कपूर कुटुंबातील दोन मोठ्या दिग्गजांचा आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, राहाचा चेहरा तिच्या आजोबांचा म्हणजेच बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार ऋषी कपूर यांच्यासारखा आहे. तर काहींचे म्हणणे आहे की राहाचे डोळे नक्कीच तिचे पणजोबा राज कपूर यांच्यावर गेली आहे. राहाचे निळे डोळे पाहिल्यानंतर बहुतांश सोशल मीडिया यूजर्सना राज कपूरची आठवण झाली.
वडील रणबीर कपूरने राहाला उचलून घेतली आहे. राहाने यावेळी पावडर गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि पांढर्या स्वेटशर्टमध्ये दिसली. राहा दोन झेंडू घालून खूप गोंडस दिसत होती. रणबीर-आलियाच्या मुलीची झलक समोर येताच ती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. स्टार किडच्या बबली, क्यूट लूकचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. राहा अगदी कपूर कुटुंबातील सदस्यांसारखीच दिसते असं युझर्स म्हणतात.