मुंबईः  'बिग बॉस'चा माजी स्पर्धक राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. राहुल महाजनने आपल्या तिसऱ्या पत्नीचा वाढदिवस अतिशय शानदार पद्धतीने साजरा केला. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल महाजनने रशियन पत्नी नताल्या इलिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
राहुल महाजनने पत्नीला सरप्राईज देण्यासाठी या पार्टीत आपल्या अनेक मित्र आणि स्टार्सना आमंत्रित केलं होतं, यावेळी सर्वांनी खूप मजा केली.



व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक लॅविश पार्टी दिली होती, ज्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी आहे आणि ती त्याच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहे.



हे जोडपे सध्या स्मार्ट जोडी या रियालिटी शोमध्ये देखील दिसत आहे. अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. याशिवाय इतर अनेक टीव्ही सेलेब्स पार्टीमध्ये सामील झाले होते. बर्थडे पार्टीत राहुल महाजनची पत्नी खूपच खुश दिसत होती.यावेळी भोजपुरी चित्रपट अभिनेत्री मोनालिसाही मस्तीच्या मूडमध्ये दिसली.


राहुल महाजनने 2018 मध्ये नताल्याशी लग्न केले होते. हा विवाह एक खाजगी सोहळा होता आणि त्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. त्यापूर्वीही राहुल महाजन खासगी आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेत होता.