राहुल महाजनचं धक्कादायक वक्तव्य म्हणाला, सासूपेक्षा १९ वर्षांनी लहान...`
वादग्रस्त सेलिब्रिटी आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक राहुल महाजन गेल्या वर्षी `स्मार्ट जोडी` नवीन जोडप्यावर आधारित रिएलिटी शोमध्ये दिसला होता. मनीष पॉलने होस्ट केलेला, हा शो खूप चर्चेत होता याचबरोबर या शोने मनोरंजनाची पातळीही उच्च ठेवली आहे.
मुंबई : वादग्रस्त सेलिब्रिटी आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक राहुल महाजन गेल्या वर्षी 'स्मार्ट जोडी' नवीन जोडप्यावर आधारित रिएलिटी शोमध्ये दिसला होता. मनीष पॉलने होस्ट केलेला, हा शो खूप चर्चेत होता याचबरोबर या शोने मनोरंजनाची पातळीही उच्च ठेवली आहे.
परफॉर्मन्स दरम्यान, राहुल महाजन आणि त्याची पत्नी नताल्या इलिना हिने कभी खुशी कभी गमच्या बोले चुडिया गाण्यावर डान्स केला होता. थोड्याच वेळात, आपल्या स्पष्टपणाने, राहुलने उघड केलं की त्याने गुपचूप नताल्याशी लग्न केलं कारण यावेळी त्याचं लग्न अधिक प्रसिद्ध व्हावे आणि मागील दोन लग्नाप्रमाणेच नातं संपुष्टात येऊ नये, म्हणून त्याने नजर लागण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी असं लग्न केल्याचं त्यांचं म्हणणं आहे .
राहुलने खुलासा केला की, त्यांच्या लग्नाचे फक्त काही फोटो उपलब्ध आहेत कारण ते एक गुप्त प्रकरण होतं. काही वेळातच त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो शोमध्ये दाखवण्यात आले आणि त्यानंतर राहुल महाजनने त्याच्या सासूबाईंचा फोटो दाखवण्याचा आग्रह धरला.
फोटोत, तो सासूच्या शेजारी एका तरुणाच्या शेजारी बसलेली दिसत आहे आणि जेव्हा होस्ट मनीषने त्या माणसाबद्दल त्याला विचारलं तेव्हा राहुलने गंमतीने सांगितल की, तो आमचा सासरा असता पण आता त्यांचं हे नातं तुटलं आहे.
राहुलने पुढे सांगितलं की, त्याचे भावी सासरे त्याची पत्नी नताल्यापेक्षा पण वयाने लहान आहे. यामुळे सगळेच थक्क झाले आणि राहुल म्हणाला, 'शौकीन सासू आहे माझी. त्यात काय आहे?" राहुल महाजनने आपल्या सासूचा बॉयफ्रेंड त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान असल्याचा खुलासा केला आहे.
स्मार्ट जोडीमध्ये भाग्यश्री आणि हिमालय, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, नताल्या इलिना आणि राहुल महाजन, अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी, बलराज सियाल आणि दीप्ती तुली, एस श्रीकांत आणि विद्या यांच्यासह इतर स्पर्धकांनी यावेळी या सीझनमध्ये सहभागी होते.