मुंबई : सध्या सर्वत्र 'स्मार्ट जोडी' (Smart Jodi) शोची चर्चा रंगत आहे. 'स्मार्ट जोडी' मध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे आहेत. ज्यामध्ये  'बिग बॉस' फेम राहुल महाजन देखील पार्टनरसोबत दिसणार आहे. यावेळी राहुलने पत्नी नताल्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आणि वयातील अंतरासोबतचं अनेक गोष्टींचा खुलासा केला. महत्त्वाचं सांगयाचं झालं तर नताल्यासोबत राहुलचं तिसरं लग्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलचं पहिलं लग्न श्वेता सिंगसोबत झालं. लग्नाच्या एक वर्षानंतर राहुल आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप श्वेताने केला. त्यानंतर 2007 साली श्वेताने राहुलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि 2008 साली दोघे विभक्त झाले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्वेतासोबत घटस्फोट झाल्यानंतर राहुलने 2010 साली मॉडेल डिंपी गंगुलीसोबत लग्न केलं. पण हे लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. डिंपीने देखील राहुलवर मारहाण करत असल्याचे आरोप लावले. 


लग्नाच्या 5 वर्षांनंतर राहुल आणि डिंपी विभक्त झाले. दोन लग्न अयशस्वी ठरल्यानंतर राहुलने 2018 साली कझाकिस्तानची मॉडेल नताल्यासोबत लग्न केलं. यावेळी नताल्याने मोठा खुलासा केला. 


राहुलने आपल्या आईसबोत लग्न करावं अशी इच्छा नताल्याने व्यक्ती केली. नताल्याची आई आणि राहुलमध्ये फक्त 4 वर्षांचं अंतर आहे. म्हणून दोघांचं लग्न व्हावं असं नताल्याला वाचत होतं.


पुढे नताल्याने राहुलच्या आधी झालेल्या लग्नाबद्दल मला काही फरक पडत नाही असं देखील ती म्हणाली. सध्या 'स्मार्ट जोडी' शोची तुफान चर्चा रंगत आहे..