Rahul Roy Birthday Special : 'आशिकी' (aashiqui) फेम अभिनेता राहुल रॉयचा (Rahul Roy) आज 9 फेब्रुवारी रोजी 55 वा वाढदिवस आहे. राहुलचा जन्म हा 1968 साली मुंबईत जन्म झाला. राहुलनं 'आशिकी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आणि राहुल रॉय एका रात्रीत सुपरस्टार झाला. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील गाणी आवडतात. मात्र, एक काळ असा आला होता जेव्हा राहुलला कोणी चित्रपटाची ऑफर देत नव्हतं. राहुल त्याच्या करिअरपेक्षा जास्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आज त्याच्या रिलेशनशिपविषयी जाऊन घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल रॉयने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एकदा तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी त्याची आईही देखील तिथे तिच्या मैत्रिणींसोबत आली होती. राहुलच्या आईनं त्याला तिच्यालोबत डान्स करायला सांगितलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी आली की राहुल एका वयस्कर महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इतकंच काय तर तो तिच्यासोबत डान्स करताना दिसला. ही बातमी वाचल्यानंतर राहुलला धक्का बसला आणि नाराजी व्यक्त करत राहुल म्हणाला, "लोकांनी किमान ती महिला कोण आहे याची खात्री करायला हवी होती." (Rahul Roy Relationship) 



राहुल रॉयच्या लव्ह लाईफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. राहुल तीन वेळा रिलेशनशिपमध्ये होता. त्याचे लग्न देखील तुटले. राहुल सगळ्यात आधी बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता. राहुल आणि पूजानं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. चित्रपटांमध्ये सतत एकत्र काम केल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले. त्यानंतर राहुल अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्या दोघांनी ‘मझधार’ आणि ‘अचानक’ या चित्रपटांच्या चित्रीकरणा दरम्यान, त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले. त्याशिवाय राहुल मॉडेल सुमन रंगनाथसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर 1998 साली राहुल रॉय राजलक्ष्मी खानविलकर यांना भेटला आणि 2000 साली त्यांनी लग्न केले. 14 वर्षे सुखी संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. तर 2016 साली राहुलची साधना सिंहशी भेट झाली. 


हेही वाचा : एकजण आला आणि त्यानं मला कुंकू फासलं...; 'त्या' भयाण प्रसंगाच्या जखमा आठवून Saumya Tandon आजही घाबरते


राहुल चित्रपटात येण्यापूर्वी दिल्लीत मॉडेलिंग करायचा. राहुलची आई इंदिरा रॉय त्या काळात आर्टिकल लिहायची. 1980 मध्ये त्यांचा लेख वाचल्यानंतर महेश भट्ट राहुलला भेटले आणि त्यांनी राहुलला 'आशिकी' चित्रपटासाठी साइन केले. हा चित्रपट सर्वाधिक हिट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या आठ महिन्यांपर्यंत त्याला एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही. त्यानंतर अचानक त्याला एकूण 60 चित्रपटांची ऑफर आलीय राहुलनं त्यापैकी एकूण 47 चित्रपट साइन केले. त्यानंतर राहुलनं 'फिर तेरी याद आई', 'जानम', 'सपने साजन के', 'गुमराह' आणि 'मझदार' सारखे चित्रपट केले, परंतु त्याचे 25 चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरले.