मुंबई : बिग बॉस सीजन 14 चा भाग बनल्यानंतर राहुल वैद्य सतत चर्चेत आहे. राहुल सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि त्याच्या फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांना वेड लावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर अलीकडेच राहुल वैद्यने पत्नी दिशा परमारसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून चाहते स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. या व्हिडिओमध्ये दोघांचे प्रेम आणि जबरदस्त बंध पाहायला मिळतात.


पत्नीसाठी गायकाने बदललं प्रोफेशन?


राहुल वैद्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल वैद्य दिशाला रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. बॅचलरसोबतच विवाहित जोडप्यांनीही  दोघांच्या या फनी व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


या जोडप्याने चाहत्यांची मने जिंकली


16 जुलै 2021 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत दिसत आहे.