मुंबई : बिग बॉस 14 संपताच स्पर्धक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येऊ लागले आहे. काही जण म्युझिक व्हिडिओत दिसले तर काही जण पार्टीत ठेका धरताना दिसले. राहुल वैद्य जरी बिग बॉस 14 चा विजेता झाला नाही मात्र त्याला सलमान खानकडून एक खास असं गिफ्ट मिळालं आहे. रूबीनाने बिग बॉस 14 चं विजेतेपद पटकावलं. मात्र त्यानंतर राहुलला सलमान खानने खास गिफ्ट दिलं आहे. राहुलने ही गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केला आहे. 


सलमानने दिलं खास गिफ्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंट आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. राहुल ई-बाइकवर पोझ देताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही ई-बाइक बीइंग ह्युमनची ई-बाइक चाहत्यांना देखील खूप आवडते. 



सलमान खानचे आभार मानताना राहुल म्हणतोय की,'अखेर सलमान खानद्वारे मला गिफ्ट मिळालं आहे. ही ई-बाइक चालवण्याचा अनुभव अतिशय सुंदर आहे. मला बाहेर फिरण्यासोबतच कार्डिओ करायला देखील आवडतं.'


बिग बॉसचा स्पर्धक राहुल वैद्य सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो.  बिग बॉस 14 चा रनरअप  ठरलेला राहुल कायम त्याची गर्लफेंड दिशा परमारसोबत दिसतो. शिवाय अनेक वेळा त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. आता सध्या राहुल आणि दिशाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. राहुल आणि दिशाच्या एका मित्राच्या लग्नातला हा व्हिडिओ आहे. 


व्हिडिओमध्ये राहुल आणि दिशा अभिनेता शाहरूख खानच्या 'मैं हु ना' सिनेमातील 'तुमसे मिलके दिलका जो हाल' या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. शाहरूख स्टारर 'मैं हु ना' 2003 रोजी प्रदर्शित झाला होता. पण  आज देखील सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.