मुंबई : शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा अपघात झाला. शबाना आझमींची कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका ट्रकला धडकली. यानंतर ट्रक ड्रायव्हरने शबाना आझमी यांच्या ड्रायव्हर विरोधात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी देखील ड्रायव्हर अमलेश कामत विरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालापूरमध्ये ट्रक ड्रायव्हरने शबाना आझमी यांच्या ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली. रॅश ड्रायव्हिंगमुळे ही कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका चालत्या ट्रकला आदळली. ज्यामध्ये शबाना आझमी गंभीर स्वरूपात जखमी झाल्या. 



या अपघातानंतर शबाना आझमी यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. आता तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. आता शबाना आझमींची तब्बेत स्थिरावली असल्याचं सांगण्यात येत आहे. 



शबाना आझमींच्या ड्रायव्हर विरोधात मोटर व्हेईकल ऍक्ट सेक्शन 279 आणि 337 च्या अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या केसमध्ये आरोपीला जामीन मिळतं त्यामुळे शबाना आझमींच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याला नोटीस देण्यात आली आहे.