मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. दोघांनी 2009 मध्ये लग्नगाठ बांधत सात ही जन्म एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना दिलं. शिल्पा आणि राज कुंद्रा यांना 2 मुलं आहेत. लग्नाला बराच काळ उलटला असला तरी दोघांमधील प्रेम अजूनही पहिल्या सारखंच आहे.मोठमोठ्या बॉलिवूड फक्शनला हे कपल एकत्र हजेरी लावताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला होता. या रॉयल वेडींगमध्ये दोघांच्या परिवारातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार सामील झाला होता. 



लग्नानंतर शिल्पा आणि राज यांनी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी खास रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला सेलिब्रिटींनी हजेरी लावत या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या.



शिल्पा शेट्टीने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. शिल्पाचा वेडिंग लूक खूपच चर्चेत होता.



शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.