शर्लिन चोप्राला आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडून मोठा दिलासा
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने शर्लिन चोप्राला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
मुंबई : राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोघांना अटकपूर्व जामिनही मिळाला आहे. याचबरोबर कोर्टाने मुंबई पोलिसांना 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने शेरलिन चोप्राला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
शार्लिनला सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने चौकशीसाठी बोलावलं होतं. शार्लिन चोप्राने गेल्या काही दिवसांत राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी राज कुंद्राच्या एका कंपनीविषयी सांगितलं जे मॉडेलसाठी एक अॅप्स बनवतं. व्हिडिओ शेअर करून त्यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती.
शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, 'आपण महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे. तिने असंही सांगितलं होतं की, सगय़ळ्यात आधी मीच तक्रार नोंदवली होती. सायबर सेलमध्ये समन्स पाठवण्यानंतर मी अंडरग्राऊंड झाली नाही. आणि ना ही शहर सोडून गेली. मी माझी तक्रार आधीच नोंदवली होती तुम्ही सायबर सेलशी संपर्क साधून माझं स्टेटमेंन्ट आणि डिटेल्स घेवू शकता.
पूनम पांडेने देखील केले होते बरेच खुलासे
राज कुंद्रा केसमध्ये पूनम पांडेने देखील बरेच खुलासे केले होते. तिझ्याकडून जबरदस्तीने एक कॅान्ट्रॅक्ट साईन करायचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा तिने असं करण्यास नकार दिला तेव्हा तिला पर्सनल गोष्टी लीक करण्याच्या धमक्या मिळू लागल्या.
राज कुंद्रा आज होणार हजर
राज कुंद्राला अश्लि-ल सिनेमा प्रकरणामुळे अटक करण्यात आली आहे. याआधी त्याला 23 जुलै पर्यंत पोलिस कस्टडी ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याची 27 जुलैपर्यंत कस्टडी वाढवण्यात आली. आज राजला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल. जिथून त्याची कस्टडी पुढे ढकलली जाईल किंवा निर्णय घेतला जाईल.