मुंबई : बॉलिवूडचं हॉट कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा लग्नाचा 9 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 2009 दोघेही विवाहबंधनात अडकले होते. राज कुंद्रा शिल्पा शेट्टीवर खूप प्रेम करतो. आपलं प्रेम दर्शवण्यासाठी तो नेहमी तिला महागड्या भेटवस्तू देत असतो. यंदाही त्याने शिल्पाला महागडं गिफ्ट दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचा वाढदिवस 22 नोव्हेबंरला असला तरी राजने 20 दिवस आधीच पत्नी शिल्पाला खास गिफ्ट दिलं आहे. राजने शिल्पाला 2.05 कोटींची रेंज रोवर वोग गिफ्ट केली आहे. त्याने यावेळी शिल्पाला एक गुलाबाच्या फुलांचा बुके देखील दिला. यानंतर दोघेही ड्राइव्हवर गेले. त्यांनी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.



याधी राजने शिल्पाला दुबईमधील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफामध्ये एक फ्लॅट गिफ्ट केला होता. ज्याची किंमत जवळपास 50 कोटींच्या घरात होती. शिल्पच्या तिसऱ्या वेडिंग अॅनिवर्सरीला राजने तिला हे गिफ्ट दिलं होतं. राजने शिल्पाला एक ब्लू लेंबोरगिनी देखील गिफ्ट केली आहे. याची किंमत 3 ते 5 कोटींच्या घरात आहे.