Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.