मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा Pornography प्रकरणी चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी पॉर्न सिनेमे बनवत इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला. या आरोपांनंतर कित्येक दिवस राज कुंद्रा तुरुंगात देखील होता. आता या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता करून आपले नाव या खटल्यातून वगळण्यात यावे, अशी विनंती राज कुंद्राने न्यायालयात केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी पुढे काय होणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Raj Kundra Pornography Case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राचं नाव प्रकरणातून वगळण्याच्या याचिकेला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे. सरकारी वकिलाने म्हटलं आहे की, राज कुंद्रा थेट पोर्नोग्राफीच्या व्यवसायात गुंतल्याचे प्रथमदर्शनी दिसते आणि तो दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.



सरकारी वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या जबाबावर राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, 'आम्ही या खटल्यात युक्तिवाद करण्यास तयार आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून लवकरचं सत्य बाहेर येईल.


पुढे पाटील म्हणाले, राज कुंद्रा विरुद्ध प्रथमदर्शनी खटला सुरू असला तरी त्याचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. ते म्हणाले की, या मुद्द्यावर आपण न्यायालयात युक्तिवाद करणार असून तो वस्तुस्थितीवर आधारित असेल. (raj kundra first wife)


नक्की काय आहे प्रकरण?  
गेल्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्राने काही मॉडेल्स आणि स्ट्रगलिंग अभिनेत्रींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावल्याचा आरोप केल्यानंतर राज कुंद्रावर आहे. (raj kundra current affairs)