Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा सध्या सार्वजनिक आयुष्यात चर्चेत असला तरीसद्धा त्याची ह्या ना कारणानं चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या एका जुन्या व्हिडीओची. सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे. यावेळी त्याचा द कपिल शर्मा शोमधील एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमीता शेट्टी दिसत आहेत. त्यामुळे ते दोघं चांगलेच चर्चेत आहेत. कपिल शर्माच्या शोमध्ये अशाच काही गमतीजमती या चालत असतात. त्यामुळे त्याच्या शोची अनेकदा चर्चा रंगते. त्यातून यावेळी कपिलनं शिल्पा आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे राज कुंद्रालाही नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. यावेळी त्यांचा असाच एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान गाजतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांपुर्वी राज कुंद्रा याच्यावर पॉर्न फिल्म्स बनवत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठी त्याला तुरूंगवासही सहन करण्यात आला होता. त्यामुळे त्याची तेव्हा चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून जेव्हा तो तुरूंगातून बाहेर आला तेव्हा मात्र त्यानं आपलं तोंड हे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या चेहरा तो कायमच लपवून ठेवत होता. त्यामुळे त्यानंतरही त्याला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात होते. त्याला आतही परत एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. त्याचे जुने वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर लोकं त्याला खूप ट्रोल करताना दिसत आहेत. 


हेही वाचा - 'पुरूषांचे भारीपण कोणी दाखवणार नाही' अशोक सराफ यांचा सवाल


हा तेव्हाचा व्हिडीओ जेव्हा राज कुंद्रा हा कुठल्याही मास्कमध्ये नव्हता. त्यामुळे तो पुर्ण चेहऱ्यात दिसतो आहे. आता चर्चा आहे त्याची या व्हिडीओची. हा व्हिडीओ 2016 सालातला आहे. तेव्हा शमीता शेट्टी, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हजर होते. तेव्हा त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसतो आहे की जेव्हा त्याचे शिल्पा शेट्टीशी लग्न झाले तेव्हा त्यानंतर त्याचा त्याला फार फायदा झाला होता. कारण ती 9 वाजताच झोपायला जायची आणि मग तो पार्टी मूडमध्ये असायचा आणि शमिताला घेऊन पार्टी करायला जायचा. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या राज कुंद्राला लोकं ट्रोल करताना दिसत आहेत. अनेकजण असं म्हणतात की, म्हणूूनच तुझ्यावर आज तोंड लपवण्याची वेळ आली होती.