Raj Thackeray Want's to call Chhatrapati Shivaji Maharaj : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती मराळमोळा गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या टॉक शोची. अवधुत गुप्ते यांच्या या टॉक शोचं नाव ‘खुपते तिथे गुप्ते’ असे आहे. हा कार्यक्रम लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात सगळ्यात पहिली हजेरी ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे लावणार आहेत. या कार्यक्रमातील अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यात अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या शोमध्ये असलेल्या जादुच्या फोनविषयी सांगतात. यावेळी अवधुत गुप्ते म्हणतात की तुमच्या आवडत्या व्यक्तीला तो डायरेक्ट कनेक्ट होईल. त्यावेळी राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतात. त्यांचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रोमो झी मराठीच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला राज ठाकरे हे मंचावर येताना दिसतात. त्याचवेळी शोमध्ये असलेल्या जादुच्या फोन विषयी सांगताना अवधुत गुप्ते म्हणतात, "हा एक जादुई फोन आहे. तो डायरेक्ट तुमच्या मनात असलेल्या व्यक्तीला कनेक्ट करतो." त्यावर राज ठाकरे म्हणतात की "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी खासकरून महाराष्ट्रात अवतराव आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मानसाला सांगाव की तुम्ही कशासाठी झगडलात?" ज्यावेळी राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना जोरात टाळ्यांचा गडगडाट केला. 



हेही वाचा : Malaika Arora अर्जुनपेक्षा 12 वर्षे नाही तर आहे दोन दशकांनी मोठी? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा


याच मुलाखतीत राज ठाकरे यांना अवधुत गुप्ते यांनी प्रश्न विचारला की “राज साहेब तुमच्या पक्षात महेश मांजरेकर, अमेय खोपकर, अभिजीत पानसे असे सिनेमे बनवणारे लोक पक्षात आहेत. पण एकालाही तुमच्यावर सिनेमा का काढावासा वाटला नाही?” त्यावर उत्तर देत अवधूत गुप्ते म्हणाले “साहेब तुमचं आयुष्य आपकी जिंदगी इतनी लंबी नही इतकी बडी भी है, तुम्ही वेबसीरिजच सुरु करा. त्याचे अनेक सिझन होतील”, असे म्हटले. दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला भाग हा 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासोबत अवधुत गुप्ते हा ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमातून जवळपास 10 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर तुम्ही हा कार्यक्रम रविवारी 4 जून रोजी पाहू शकता.