मुंबई: बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे एकापेक्षाएक सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत भर पडत आहे. रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'गली बॉय'चा  ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांच्या मनात वेगळीच छाप पाडली. 14 फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमागृहात दाखल होणार आहे. सध्या रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमानंतर  राजस्थान येथे पोहचला. सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणवीर राजस्थानला गेला होता. तिकडे त्याने 
'अपना टाइम आएगा' हे रॅप सादर करुन जमलेल्या चाहत्यांची आणि पोलिसांची मने जिंकली. या प्रमोशनचा एक  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




राजस्थान पोलिसांनी सुद्धा त्याच्या या पोस्टला उत्तर दिले.' तुम्ही येथे गली बॉय म्हणून आलात, येथे येवून तुम्ही बाजीराव मस्तानी झालात अचानकच तुम्ही सुपर सिम्बाच्या रुपात दिसलात. तुमच्या सोबत घालवलेले क्षण नेहमीच लक्षात राहतील. पुढच्या वेळेस राज म्हणून दीपिका पादुकोन सोबत या आम्ही बॅंड बाजा बारात घेवून तुमच्या स्वागतासाठी हजर राहु'.