2 वर्षात कशी जमवली 200 कोटींची संपत्ती, दोन-दोन बायकांचा एकुलता एक नवरा!

Youtuber Armaan Malik : लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोय. सगळ्यात जास्त चर्चा ही त्याच्या दोन्ही पत्नींची असते. आता त्यानं खुलासा केला आहेलकी त्याची संपूर्ण संपत्ती ही त्या दोघींच्या नावावर आहे. 

| May 20, 2024, 18:38 PM IST
1/12

अरमान मलिक

अरमान मलिक हा लोकप्रिय युट्यूबर आहे. रील्स आणि व्लॉगिंगच्या मदतीनं अरमान आज कोट्याधीश आहे. 

2/12

मुलाखतीत केला खुलासा

'सिद्धार्थ कनन'ला अरमाननं त्याच्या दोन्ही पत्नींसोबत मुलाखत दिलीय या दरम्यान, त्याच्या नेटवर्थवर प्रश्न विचारण्यात आला. 

3/12

प्रश्न टाळण्याचा केला प्रयत्न

हा प्रश्न येताच अरमान, पायल आणि क्रितीका तो टाळण्याचा प्रयत्न करत होते. अखेर अरमाननं उत्तर दिलं. 

4/12

किती आहे एकूण संपत्ती?

अरमान खुलासा करत म्हणाला की "100-200 कोटींची आमची नेटवर्थ आहे. हे सगळे आम्ही युट्यूबच्या मदतीनं कमावले. ही दीढ वर्षांपूर्वीची कमाई आहे." 

5/12

फक्त शिल्लक होते 35 हजार

कधी पैशांची होती अरमानकडे कमी, "कोव्हिडचा काळ संपला तेव्हा माझे 11 ईएमआय हे गाड्यांचे होते. गाडी घेऊन जाणारं कोणी नव्हतं तेव्हा आमच्याकडे फक्त 35 हजार रुपये होते." 

6/12

टिकटॉकमधून झाली कमाई, "टिकटॉकनं क्रिएटर्सला 2-2.5 लाख देण्यास सुरुवात केली. जेव्हा मी चंडीगढला आलो तेव्हा 50 हजार रुपये भाडं देत घर भाड्यावर घेतलं. दोन एडिटर होते, त्यांना पगार द्यायचा होता. घर चालवायचं होतं आणि ईएमआय भरायचे होते." 

7/12

महिन्याला शिल्लक रहायची इतकी रक्कम

 अरमान पुढे म्हणाला, "टिकटॉकमधून 2.50 लाख आले की त्यातून फक्त 15-20 हजार शिल्लक रहायचे. त्यात फेसबूक, युट्यूब, इन्स्टाग्राम करायला सुरुवाच केली. सगळं वाढवलं." 

8/12

पहिल्या कमाईतून केलं 'हे' काम

पहिल्या मोठ्या कमाईतून त्यानं अ‍ॅनिमल फार्म खरेदी केलं. त्याच्याकडे लोकप्रियता आणि पैसेही नव्हते. 

9/12

इतकी आहेत घरं

अरमाननं खुलासा केला की "त्याचे बिल्डिंगमध्ये 10 फ्लॅट आहेत. त्यातील 4 फ्लॅटमध्ये तो राहतो आणि बाकी 7 फ्लॅट हे त्यानं त्याच्या टीमला दिले आहेत." 

10/12

अशी करतात कमाई!

अरमान यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबूकसारख्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सवर अॅक्टिव्ह आहे. तर त्याच्या दोन्ही पत्नी या म्यूजिक व्हिडीओमधून कमाई करतात. 

11/12

पत्नींच्या नावावर

अरमाननं खुलासा केला की "त्याच्या घरातील सगळ्या वस्तू या त्याच्या पत्नींच्या नावावर आहे. उद्या जाऊन जर मला कोणी घरातून काढूनही टाकलं तर यांनी असा विचार करायला नको की माझ्या मुलांलाठी काय आहे." 

12/12

...तर माझ्याकडे राहणार नाही एक रुपया

"सगळं त्यांच्यासाठी आहे. त्यांनी जर मला हकलवलं तर सगळं साम्राज्या हे त्यांच्याकडेच राहिलं. माझ्याकडे एक रुपया राहणार नाही."