आईवडील दोघंही सुपरस्टार, पण अभिनयात मुलगी फ्लॉप.. लग्न करून गेली परदेशात
Rinkie Khanna: पालक सुपरस्टार असतील तर मुलंही सुपरस्टारचं होतील असं नाही. त्यातून असे अनेक कलाकार आहे ज्यांची मुलं स्टार होऊ शकली नाहीत. त्यांनी बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले परंतु त्यासाठी मात्र त्यांना हवे तसे यश आलेच असे नाही.
Rinkie Khanna: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार कलाकार आहे ज्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. परंतु जेवढी त्यांच्याबद्दल ही चर्चा रंगलेली असते त्याप्रमाणे किंवा त्याहूनही जास्त चर्चा रंगते ती म्हणजे त्यांच्या मुलांची. असे अनेक स्टार कीड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये आपलं नशीब फारसं आजमावू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. त्यातून बॉक्स ऑफिसवरही त्यांच्या पिक्चरची जास्त जादू चालू शकलेली नाही. आज या लेखातून आपण अशाच एका स्टार कीडबद्दल बोलणार आहोत जी फार मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारची मुलगी असून तिनंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले होते परंतु ती मात्र जास्त आपलं नशीब आजमावू शकली नाही. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे राजेश खन्ना यांच्या मुलीची. तिचं नावं म्हणजे रिंकी खन्ना. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची धाकटी मुलगी रिंकी खन्ना ही आहे म्हणजेच ती टिंक्वल खन्ना हिची सख्खी बहीण आहे.
आज राजेश खन्ना यांची मुलगी रिंकी खन्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तिची चर्चा आहे ती म्हणजे कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये ती आपलं नशीब आजमावू शकली नव्हती. तेव्हा चला तर पाहुया की नक्की तिची स्टोरी काय होती. राजेश खन्ना हे आपल्या मुलींवर प्रचंड प्रेम करायचे. त्यातून आपल्या लेकींसाठी ते खासकरून सगळ्या गोष्टी करायचे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे रिंकी खन्ना आणि तिच्या फ्लॉप करिअरची. त्यातून आपले आईवडील दोघंही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय सुपरस्टार होते परंतु नशीब पालटलं आणि सर्वंच गोष्टी बदलल्या. त्यातून तिनं हिंदी चित्रपटांमधूनही कामं केली होती. परंतु ती फारशी टिकली नाहीत. तिला चांगले सिनेमे मिळाले परंतु त्या चित्रपटांची जास्त चर्चा रंगली नाही.
हेही वाचा - बक्कळ कमाईचा फंडा; तुम्हाला खाण्याची प्रचंड आवड आहे? मग 'हे' 5 जॉब तुमच्यासाठीच
राजेश खन्ना यांना दुसऱ्यावेळेला आपल्या पोटी मुलगा जन्माला येईल अशी अपेक्षा होती. तिचा जन्म 24 जूलै रोजी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं समोर आलं आहे की जेव्हा राजेश खन्ना यांना दुसरी मुलगी झाली होती तेव्हा ते प्रचंड दु:खी झाले होते कारण त्यांना मुलगा हवा होता. ते आपल्या लेकीचे नावंही ठेवायला विसरले होते. त्यातून चित्रपट पत्रकार इंग्रिड अलबकर्क यांच्यानुसार त्यांनी अनेक दिवस त्यांच्या दुसऱ्या मुलीचा चेहराही पाहिला नव्हता.
परंतु ज्यावेळी राजेश खन्ना गेले तेव्हा त्यांच्या शेवटच्या क्षणी रिंकी त्यांच्यासोबतच होती. प्यार में कभी कभी या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. परंतु त्यानंतर मात्र तिनं बॉलिवूडला बाय बाय केले आणि मग 2003 मध्ये बिझनेसमन समीर सरन ह्याच्याशी लग्न केल्यानंतर मात्र ती लंडनला स्थायिक झाली.