Rajesh Khanna Dimple Kapadia Marriage : भारतीय कलाजगतामध्ये पहिलेवहिले सुपरस्टार म्हणून अभिनेता राजेश खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. सलग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या खन्ना यांनी अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तरुणी तर या अभिनेत्यासाठी वाटेल ते करत होत्या. कारचा पाठलाग करणं असो किंवा मग त्यांना पत्र लिहिणं असो, या तरुणी कधीच मागे हटल्या नाहीत. (Rajesh Khanna Why 16 year old Dimple could not reject Rajesh Khanna Wedding Proposal nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रसिद्धीमुळे 'काका' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्ना यांच्या मनात मात्र आणखी कुणी घर केलं होतं. ती वयाने लहान असणारी अभिनेत्री होती, डिंपल कपाड़िया (Dimple Kapadia). राजेश खन्ना आणि डिंपल कपाड़िया यांच्या वयात 16 वर्षाचे अंतर होते. त्यावेळी ‘बॉबी’ मधून डिंपलनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर लगेचच राजेश खन्ना यांच्यासोबतच्या तिच्या नात्यानं नजरा वळवल्या. 


आणखी वाचा - Arranged Marriage करण्याआधी 'या' 5 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप अटळ


तुम्हाला माहितेय का राजेश खन्ना यांनी डिंपल कपाड़िया यांना रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केले होते. राजेश खन्ना चांदण्या रात्री अभिनेत्री डिंपल कपाड़िया यांना  समुद्रकिनारी घेऊन गेले आणि तिथेच त्यांनी प्रेमाची कबुली दिली. त्यांचे हेच प्रेम पाहून डिंपल Proposal नाकारु शकल्या नाहीत. कारण, खुद्द त्यासुद्धा त्यांच्या चाहत्यांपैकीच एक होत्या. 



ज्या अभिनेत्याला आपण शालेय आयुष्य़ापासून पाहिले त्याला लग्नासाठी नकार देणं म्हणजे अशक्य. लग्नाचा प्रस्ताव स्वीकारत पुढे डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांची पत्नी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतर  डिंपल कपाड़िया यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते त्यातच त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि  रिंकी खन्ना अशी त्या मुलींची नावे.


आणखी वाचा - उंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा


या वैवाहिक नात्यातही चढ उतार आले. त्या दोघांमध्ये तणावाचे प्रमाण वाढल्यामुळे ते दोघे एकमेकांपासून लांब राहू लागले पण घटस्फोट मात्र झाला नव्हता.  दरम्यानच्या काळात राजेश खन्ना यांना कॅन्सर झाला होता. तेव्हा डिंपल कपाड़िया त्यांच्या देखभालीसाठी त्यांच्यासोबत राहू लागल्या शेवटी 2012 मध्ये कॅन्सरमुळेच या सुपरस्टारचे निधन.