मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आजही चाहते तितक्याचं आवडीने पाहतात. बिग बींचा एखादा चित्रपट फ्लॉप गेला असला तरी त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आज देखील कोणताही कार्यक्रम असला की त्यांची गाणी एक वेगळाचं वातावरण निर्माण करतात. 1981साली बिग बींचा प्रदर्शित झालेल्या 'याराना' चित्रपटाने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. मैत्रीवर साकारण्यात आलेल्या या चित्रपटांच्या गाण्यांनी तो काळ गाजवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या चित्रपटातील गाणं आहे. 'छू कर मेरे दिल को..'  या गाण्याचे कंपोजर राजेश रोशन यांनी या गाण्यासंबंधित एक किस्सा शेअर केला आहे. म्यूझिक दिग्दर्शक राजेश रोशन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ता इंडियन एक्स्प्रेससोबत एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले, 'अमिताभ बच्चन 'याराना' चित्रपटाच्या गाण्यासाठी माझ्या रूममध्ये यायचे..'



ते पुढे म्हणाले, 'जेव्हा चित्रपटाची शुटिंग सुरू होती तेव्हा ते कोलकातामध्ये होते. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, हे गाणं फार फास्ट आहे. मी शुटिंग करू शकत नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो माझ्यावर विश्वास आहे तर शूट करा, मला जाणवलं होतं  की ते रागाचं बोलत होते. पण जसं गाणं शूट करायला सांगितलं तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता गाणं शूट केलं...'


'त्यांना वाटलं असतं तर त्यांनी दिग्दर्शक राकेश रोशन यांना सांगून हवे तसे बदल करता आले असते . पण त्यांनी असं केलं नाही. किशोर कुमार यांनी या गाण्याला आवाज दिला.' आज देखील याराना चित्रपटातीलचं नाही तर बिग बींच्या इतर चित्रपटांमधील गाणी सुपरहीट ठरली आहेत.