चैन्नई : येथील शिवाजी गणेशन मेमोरियलच्या उद्घाटन समारंभामध्ये कमल हसन आनी रजनीकांत एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघेही बराच वेळ गप्पा मारत होते. तसेच या कार्यक्रमामध्ये कमल यांच्याकडून रजनीकांतने काही राजकीय सल्लादेखील घेतल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांनी कमल हसन यांना राजकारणातील यशाबद्दल विचारले असता माझ्यासोबत या म्हणजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देतो असेही ते म्हणाले.  




गेले काही दिवस कमल हसन त्यांचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन  करण्याचा विचार करत आहेत. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असतील तर त्यांच्यासोबत काम करण्याचा मानस असल्याचे कमल हसन यांनी सांगितले आहे.


काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि कमल हसन यांची भेट झाल्याने अनेक चर्चांना ऊत आला होता. तर मोदींच्या स्वच्छता अभियानात रजनीकांत यांचा समावेश झाल्याने ते नक्की कोणासोबत जाणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.