Rajinikanth Maldives Vacation :  दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून 'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील 'कावाला' हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. या सगळ्या प्रमोशनमधून रजनीकांत यांनी वेळ काढून सुट्टीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी यावेळी मालदीव हे ठिकाण निवडले. रजनीकांत यांना इथे आल्याचे पाहता तिथल्या लोकांनी रजनीकांत यांचे भव्य स्वागत केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांनी तिथे बराच टाईम व्यथित केला आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा चित्रपटाच्या ऑडियो लॉन्चला पुन्हा चेन्नईत आले आहेत. रजनीकांत हे मालदीवमधील एका आलिशान रेसॉर्टमध्ये थांबले होते. दरम्यान, रजनीकांत यांचा हा व्हिडीओ kudavillingiliresort या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रजनीकांत हे एका बोट मधून रिसॉर्टमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर त्यांची कशा प्रकारे भव्य स्वागत केले हे पाहायला मिळत आहे. ढोल-ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. त्यांची केलेला आदर सत्कार पाहता रजनीकांत यांनी त्यांचे हाथ जोडून आभार मानले. रजनीकांत यांचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर अनेकांनी रजनीकांत यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नाही त्यांनी जितक्या साधारण व्यक्ती प्रमाणे केलेल्या स्वागताचे आभार मानले हे पाहून आनंद झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रजनीकांत हे मालदीववरून येताना श्रीलंकाई एयरलाइंसनं आले. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रजनीकांत यांच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी 'सुपरस्टार ऑनबोर्ड असे कॅप्शन देखील दिले. आम्ही मालदीववरून चेन्नईच्या आमच्या या ट्रीपमध्ये रजनीकांत यांचे खूप स्वागत करत आहोत. भविष्यातही तुम्ही आमच्या या यात्रेत सहभाही व्हाल याची आशा आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'स्वर्गात आणि कोकणात जायचा रस्ता कठीण...', मुंबई-गोवा हायवेवर अभिनेत्रीने मांडलं परखड मत, VIDEO व्हायरल


रजनीकांत यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते जेलर या चित्रपटात दिसतील. या चित्रपटात त्यांच्यासोबत तमन्ना भाटिया, मोहनलाल, सुनी, जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णनन हे कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक नेलसन दिलीपकुमार यांनी केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चित्रपटातील 'कावाला' या गाण्याचं आता हिंदी व्हर्जन देखील आलं आहे. त्यासोबत चित्रपटातील 'हुकुम' हे गाणं देखील चांगलंच व्हायरल झालं आहे.