Rajinikanth On Tirupati Laddu Controversy : तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जायची यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता यावर दाक्षिणाच्य सुपरस्टार रजनीकांत यांनी रिअ‍ॅक्ट केलं आहे. त्यांनी या प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. खरंतर रजनीकांत यांनी काल शनिवारी 28 सप्टेंबर रोजी तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून सुरु असलेल्या वादावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत हे नुकतेच चेन्नई विमानतळावर स्पॉट झाले आणि त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो काढताना दिसले. त्यांना यावेळी कथितपणे प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळण्यावर विचारण्यात आलं. त्यावेळी रजनीकांत हसले आणि पापाराझींना म्हणाले, मला माफ करा, मला कोणतीही कमेंट करायची नाही. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते नेहमीच वादग्रस्त प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देण्यापासून स्वत: ला लांब ठेवतात. 



त्याआधी त्यांनी जस्टिस हेमा कमेटी रिपोर्टवर देखील काही बोलण्यास नकार दिला होता. त्या रिपोर्टमध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांवर झालेल्या अत्याचारावर अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. आंध्र प्रदेश सरकारनं तिरुमाला वेंकटेश्वर मंदिराच्या लाडूच्या प्रसादात तूपा ऐवजी प्राण्यांची चरबी मिसळण्याच्या आरोपांवर तपास करण्यासाठी एक स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम बनवली आहे. गुंटूर रेंजचे इंस्पेक्टर जनरल ऑफ पोलिस सर्वश्रेष्ठ त्रिपाठीच्या नेतृत्वमध्ये एसआयटी इतर अनियमित गोष्टींची चौकशी करणार आहे. 


दरम्यान, या आधी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी कार्थीला धार्मिक प्रकरणात बोलण्याआधी विचार करायचा. ज्यानंतर कार्थीनं एक्सवर लिहिलं की 'प्रिय पवन कल्याण सर, तुमचा मी खूप आदर आणि सन्मान करतो, माझ्याकडून अचानक झालेल्या कोणत्या चुकीची माफी मागतो.' 


हेही वाचा : IIFA 2024 Winners List : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'नं जिंकले 4 पुरस्कार तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला...


दरम्यान, रजनीकांत यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते लवकरच Veetaiyan या अॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन TJ Gnanavel करणार आहेत. त्याशिवाय लोकेशन कनगराज दिग्दर्शित 'कूली' या चित्रपटात देखील दिसणार आहे.