IIFA 2024 Winners List : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'नं जिंकले 4 पुरस्कार तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला...

IIFA 2024 Winners List : काल आयफा 2024 हा अवॉर्ड शो पार पडला त्यावेळी कोणत्या सेलिब्रिटींना कोणता पुरस्कार मिळाला जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: Sep 29, 2024, 10:33 AM IST
IIFA 2024 Winners List : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'नं जिंकले 4 पुरस्कार तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला...  title=
(Photo Credit : Social Media)

IIFA 2024 Winners List : काल शनिवारी 28 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा अवॉर्ड शो आयफा 2024 झाला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाहरुख खानपासून राणी मुखर्जीपर्यंत अनेक कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

शाहरुख खानचे एकामागे एक तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जवान या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर राणी मुखर्जीला तिचा कमबॅक चित्रपट ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक कमाई केली, मात्र, चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाची चांगलीच स्तुती केली. 

कोणाला कोणते पुरस्कार मिळाले?

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विधु विनोद चोप्रा (12वीं फेल)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शबाना आजमी (रॉकी और राणी की प्रेम कहानी)
  • सर्वोत्कृष्ट खलनायकाची भूमिका : बॉबी देओल (अ‍ॅनिमल) 
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : प्रीतम, विशाल मिश्रा, मानव भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बाल, अशीम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर (अ‍ॅनिमल) 
  • सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (पुरुष) : भूपिंदर बब्बाल- अर्जन वेल्ले (अ‍ॅनिमल) 
  • सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (स्त्री) : शिल्पा राव (जवान)

स्पेशल अवॉर्ड्स

  • भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी : हेमा मालिनी
  • डेब्यूटंट ऑफ द इयर : अलिजेह अग्निहोत्री
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : इशिता मोइत्रा, शशांक खेतान, सुमित रॉय (रॉकी और राणी की प्रेम कहानी)
  • सर्वोत्कृष्ट गाणं : सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहल - सतरंगा (अ‍ॅनिमल) 
  • चित्रपटांमध्ये 25 वर्ष उत्कृष्ट कामगिरी : करण जोहर

बॉलिवूड सेलिब्रिटींनी यावेळी त्यांचे डान्स परफॉर्मन्स करत सगळ्यांसाठी ही रात्र आठवणीत राहिल अशी केली. शाहिद कपूर, क्रिती सेनन, विकी कौशलनं स्टेजवर डान्स केला. शाहिद कपूरनं प्रभू देवा आणि क्रिती सेननसोबतचा डान्स पाहून चाहते उत्साही झाले होते.