Amitabh Bachchan Rajinikanth Video : 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी सप्तपदी घेतल्या. त्यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फक्त भारतातील नाही तर परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सेलिब्रिटींची देखील हजेरी पाहायला मिळाली. तर सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन हे त्यांची नात नव्या नवेली नंदासोबत पोहोचले होते. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात रजनीकांत हे त्यांची पत्नी लता यांच्यासोबत दिसत आहेत. जेव्हा 73 वर्षीय रजनीकांत यांनी 81 वर्षांच्या अमिताभ यांना पाहिलं. अमिताभ यांना पाहिल्यानंतर लगेच रजनीकांत हे त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी जातात. तर बिग बींनी लगेच रजनीकांत यांना असं करण्यापासून थांबवलं आणि त्यांना मिठी मारली. दोघांनी हात जोडून एकमेकांना नमस्कार केला. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 



32 वर्षांपूर्वी केलंय एकत्र काम


अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दोघांनी 32 वर्षांपूर्वी 'हम' या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्या काळातील लोकप्रिय आणि सगळ्यात हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर ते दोघं आता पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. ते दोघं 'Vettaiyan' या चित्रपटात दिसणार आहे. 


अनंत आणि राधिका यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात किम कर्दाशियन आणि तिच्या बहिणीनं देखील हजेरी लावली होती. त्याशिवाय परदेशात अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहेत. आज 14 जुलै रोजी ग्रॅंड रिसेप्शन पार्टीचे आजोयन करण्यात आले आहे. 


हेही वाचा : VIDEO : 'अरबाज खानसारखा दिसतोस'वर रॉजर फेडररची पहिली प्रतिक्रिया म्हणाला, 'त्यांना हे कसं...'


दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यात सेलिब्रिटींनी शाहरुख खान ते रणवीर सिंगपासून जे कोणी ग्रुम्समेन होते त्यासगळ्यांना प्रत्येकी 2 कोटींची घड्याळ ही भेट म्हणून दिली आहे. त्याच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.