मुंबई: सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या पून्हा एकदा लग्न बेडीत अडकणार असल्याचा खुलासा खुद्द सौंदर्याने केला. अभिनेता-उद्योगपती विशागन वनंगमुदी आणि सौंदर्या हो दोघे  ११ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याला एक आठवडा बाकी असल्याचे सौंदर्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. सौंदर्याचा पहिला विवाह उद्योगपती अश्विन राजकुमासोबत २०१० साली पार पडला होता. या दोघांना वेद नावाचा मुलगा देखील आहे. २०१६ साली सौंदर्याने न्यायालयात याचीका सादर केली होती. लग्नाच्या सात वर्षांनंतर दोघांनी संगनमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सौंदर्याने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला होता,'धनुष आणि माझे वडील यांची जीवनशैली साधारण सारखीच आहे, त्यामुळे माझ्या बहीणीला लग्नानंतर जास्त अडचणी आल्या नाहीत पण माझ्या लग्नाच्या तीन वर्षांनंतर ही मला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागत होते. आतापर्यंत मी समजून घेत होते पण अश्विनची जीवनशैली फारच वेगळी आहे.' 


सूत्रांच्या सांगणयानुसार ३५ वर्षीय अभिनेता विशागन वनंगमुदीचा सुद्धा हा दुसरा विवाह आहे. त्याचा पहिला विवाह मॅगजीन संपादक कनिखा कुमारन सोबत झाले होते. पण त्याचे लग्न जास्त काळ टिकले नाही. आता कनिखा निर्माता वरुण मनियनची पत्नी आहे. 


ग्राफिक्स डिझायनर म्हणून सौंदर्याने तिच्या करियरची सुरुवात केली होती. सौंदर्या ने 'बाबा', 'मजा', 'संदाकोझी' आणि 'शिवाजी' या सिनेमात काम केले आहे. २०१८ साली विशागन ने तमिळ सिनेमा 'वंजागर उलागम'मध्ये डेब्यू केला होता. विशागन एका औषध कंपनीचा मालक आहे.