रजनीकांतच्या `काला`ची पहिल्या दिवसाची कमाई
पहिल्यांदा सुपरस्टारच्या बाबतीत घडलं असं
मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा 'काला' गुरुवारी जगभर प्रदर्शित झाला. जगभरातील 2000 स्क्रिन्सवर रिलीज झालेला हा सिनेमा सुरूवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमाच्या रिलीज अगोदर कावेरी नदीवर केलेल्या वक्तव्यामुळे रजनीकांतवर टीकेची झोड उठली होती. यामुळेच कर्नाटकमध्ये काला हा सिनेमा बॅन करण्यात आला. कालांतराने बॅन हटवल्यानंतरही हा सिनेमा फार थिएटर्समध्ये रिलीज झाला नाही. एवढं सगळं होऊनही या सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळालेली नाही.
सुपरस्टार रजनीकांतचे अनेक चाहते असून कायमच त्यांना थलायवाच्या सिनेमांची उत्सुकता असते. मात्र कालाच्या बाबतीत थोडं वेगळं झालं आहे. रजनीकांतचा पहिला असा सिनेमा आहे ज्याला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फार चांगली ओपनिंग मिळाली नाही. तामिळनाडू फिल्म प्रोड्यूसर्स काऊंसिलचे अध्यक्ष आणि अभिनेता विशाल यांनी सांगितले की, या सिनेमाबाबत एवढ्या लवकर कोणताच निष्कर्ष ठरवू शकत नाही. कावेरी या वादाचा फटका कालावर पडला का? असं आता सांगण योग्य ठरणार नाही. मला फक्त एवढंच माहित आहे, रजनी सर, रजनी सर आहेत.
पुढे विशाल असं म्हणाला की, रजनी सरांच्या कोणत्याही सिनेमाला चांगलीच ओपनिंग मिळते. मला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी कालाची ओपनिंग पाहू शकलेले नाही. येणाऱ्या पुढील दिवसांत सिनेमा चांगली कमाई करेल यात काही शंकाच नाही. तसेच आपण हे विसरता कामा नये की, हा रमजानचा महिना आहे. या दिवसांत अनेक लोक सिनेमे पाहत नाहीत. रजनीकांत यांचा हा सिनेमा जावई धनुषने प्रोड्यूस केला आहे. सिनेमाला रिलीजच्या अगोदरच 200 करोड रुपयांची कमाई केली आहे.