मुंबई : थलायवा रजनीकांतचा 'दरबार' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांचे सिनेमे म्हणजे चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. मुरूगादॉस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'दरबार' सिनेमा 9 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रजनीकांत यांनी पोलिसाची भूमिका साकारत असून या पोलिसाने मुंबई सारख्या शहरातील ड्रग्सच रॅकेट जाळण्याचं मिशन हाती घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 जानेवारी रोजी हा सिनेमा 4000 स्क्रिनवर शेअर झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांना आवडला आहे. ओपनिंग डेच्या दिवशी सिनेमाने चेन्नईत तब्बल 2.27 करोड रुपयांची कमाई केली आहे. भारतासह हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. 



थलायवा रजनीकांतचा दरबार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मुंबईतील एका चित्रपटगृहात रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष करत दरबार चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. 




मुंबईतील सायन परिसरात असलेल्या एका चित्रपटगृहात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत दरबार चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. रजनीकांत यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. या निमित्तानं दरबार या चित्रपटाचा ७० फुटी पोस्टर तयार करण्यात आला. या पोस्टरला दुग्धाभिषेक करत चाहत्यांनी जल्लोश केला. काही ठिकाणी तर चित्रपट सुरू होताच चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचं पहायला मिळालं.‘दरबार’ या चित्रपटात रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारत आहेत. ‘दरबार’ चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच नयनतारा, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.