मुंबई : शमिता शेट्टी आणि राजीव अदातियामध्ये भावा बहिणचं नातं आहे. शमिता आणि राजीवचं नाही तर शिल्पादेखील एकमेकांना भाऊ-बहिण मानतात. शोमधून निघाल्यानंतर राजीव आणि शिल्पा दोघं शमिताला सपोर्ट करताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिमेशननंतर सोशल मीडियावर एक्टिव्ह झाला राजीव
बिग बॉस १५मध्ये एलिमेट झाल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. कारण राजीव शोमधील सगळ्यात एंटटेनिंग कनटेस्टंट आहे. शोमध्ये राजीव आणि शमिताचं मजबूत नातं चाहत्यांना पाहायला मिळालं. घरात कधी-कधी राजीवने शमिताला नाराजदेखील केलं आहे. मात्र घरातून निघाल्यानंतर राजीवने शमिताला सपोर्ट केल्याचं दिसत आहे.


शिल्पा शेट्टीदेखील आहे राजीवची मानलेली बहिण
राजीवची जेवढी चांगली मैत्री शमितासोबत आहे. तेवढीच चांगली बॉन्डिंग त्याची शिल्पा शेट्टीसोबतही आहे. नुकतंच शिल्पासोबत राजीवने एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये शिल्पा पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. राजीव  शिल्पासोबत शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला गेला आहे. फोटो शेअर करत राजीवने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझी बहिण शिल्पा शेट्टीसोबत शिर्डीला दर्शनासाठी निघालो आहे. 'ओम साई राम' यासोबतच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील शिल्पासोबत साईंच्या दर्शनासाठी गेला आहे.



याचबरोबर शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर वणीच्या सप्तश्रूंगी देवीचे फोटो तिच्या स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. शिर्डी साईबाबंच्या दर्शनाबरोबरच शिल्पा वणीच्या सप्तश्रूंगीच्या दर्शनाला गेल्याचं दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.