मुंबई : संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या 'संजू' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. राजकुमार हिरानी सध्या 'संजू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असले तरीही त्यांनी संजय दत्तच्या चाहत्यांना एक खूषखबर दिली आहे. लावकरच संजय दत्तच्या 'मुन्नाभाई'चा सिक्वेल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 


  मुन्नाभाईचा तिसरा सिक्वेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांना भेटीला येणार असूब त्याचा सिक्वेल बनवण्याची इच्छा राजकुमार हिरानी यांनी बोलून दाखवली आहे.  


 लवकरच कामाला होणार सुरूवात 


 आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकुमार हिरानी यांनी चाहत्यांना ही खूषखबर दिली आहे. लवकरच मुन्नाभाईच्या तिसर्‍या सिरीजवर काम सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 
 
गेले अनेक दिवस 'मुन्नाभाई'च्या कहाणीवर काम सुरू आहे. मात्र पहिल्या दोन भागांच्या तुलनेत कहाणी नसल्याने हा सिनेमा मागे पडला होता. मात्र आता आमच्या एक खास आयडिया आणि कहाणी आहे. ज्याद्वारा आम्ही लवकरच नवा सिनेमा करू शकतो. असेही राजकुमार हिरानी म्हणाले. 
 
 मुन्नाभाई  एमबीबीएस आणि त्याच्या सिक्वेलला चाहत्यांनी बॉक्सऑफिसवर प्रचंड प्रतिसाद दिला. यासोबतच चाहत्यांचे मिळालेले प्रेम खस असल्याची भावना राजकुमार हिरानी यांनी बोलून दाखवली आहे.