मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने आपल्या एका दशकाहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत. नुकताच अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भिड' या चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत दिसणारा राजकुमार लवकरच ओटीटीवरही पदार्पण करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार राव  एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. यानंतर 2013 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यासह त्याला शाहिद या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.  राजकुमार राव चित्रपटसृष्टीत अनेक नावांनी ओळखला जातो


"अष्टपैलू  अभिनेता" "वैचारिक अभिनेता" "नव विचारी अभिनेता" एवढं सगळं असून आपल्या कामातून नेहमीच काहीतरी बेस्ट देऊन राजकुमार राव काम करत राहतो. मानवी विचार आणि भारतीय सामाजिक जाणीव या बद्दल सखोल विचार करून तो त्याची काम सर्वोत्तम करतो. 


एक अभिनेता म्हणून त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. " बायसेप बद्दल प्रेम असलेला , प्रोटीन शेक चगिंग " आणि बधाई दो मधल्या पोलिसांची भूमिका साकारून सगळ्यांच मनोरंजन करणारा अभिनेता ते आता आपली जातीय ओळख लपवून आपल्या कुटुंबाचं नाव बदलून स्थानिक कामगारांच स्थलांतरित रुप भीडमध्ये साकारणारा अभिनेता असो किंवा आपल्या कामाची एक अनोखी शैली साकारून ओ माय डार्लिंग मधली राजकुमार ची भूमिका असो त्याने प्रत्येक कलाकृती उत्तम साकारली आहे. 


भीड चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर राजकुमार राव याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे ज्यात त्याने आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. राजकुमारच्या अभिनयाची तारीफ आणि प्रेक्षकांनी या भूमिकेला प्रेम दिलं. उत्कृष्ट अभिनयासाठी राजकुमारला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखलं जातं. अनुभव सिन्हा यांच्या 2023 मधला उत्तम चित्रपट म्हणून भीडच कौतुक झालं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 


नुकतंच राजकुमार राव याला " मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन आणि" बेस्ट अक्टर ज्युरी" या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मिस्टर अँड मिसेस माही, गन्स अँड गुलाब्स एसआरआय आणि श्रीकांत बोला यांचा बायोपिक अश्या अनेक आगामी चित्रपटात राजकुमार राव दिसणार आहे. 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्याने 'ट्रॅप्ड', 'स्त्री', 'शादी में जरूर आना' अशा अनेक सिनेमांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.