मुंबईः बॉलीवूडमधील नेपोटिझम हा अत्यंत चर्चेचा विषय, त्यातून बाहेरून नवे चेहरे हे बॉलीवूडमध्ये येऊन आपले नशीब आजमावत असतात. प्रत्येकाला आपापला स्ट्रगल करावा लागतो. सुशांत सिंग राजपूतपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सगळेच आऊटसाईडर्स हे मोठा स्ट्रगल करून आले आहेत. आजही अनेकांना या नेपोटिझमचा त्रास होतो आणि आजही अनेक प्रेक्षक यामुळेच संतप्त आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या वेळेस तर नेपोटिझम हा विषय बराच चर्चिला गेला होता. तेव्हा कुठे लोकांना बॉलीवूडमध्ये येणाऱ्या आऊटसाईडर्सचे महत्त्व कळले होते. आजही हे सगळे आऊटसाईडर्स मात्र आपला स्ट्रगल सांगितल्याशिवाय राहत नाहीत, असाच एक अभिनेता आपलाही वेगळा असा स्ट्रगल लपवू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार रावने पहिल्यांदा चित्रपटांमध्ये छाप पाडली जेव्हा तो 2010 मध्ये दिबाकर बॅनर्जी यांच्या 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटात दिसला पण त्याला पहिली संधी मिळण्यापूर्वीच राजकुमारने सांगितले की त्याला अनेक ऑडिशन्समधून नाकारण्यात आले आहे आणि अनेक रॉल्ससाठी त्याला नाकारण्यातही आले. एका मुलाखती दरम्यान राजकुमार रावने त्याच्या स्ट्रगल्सच्या वेळेची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. तो म्हणाला , "मला माझ्या शरीरयष्टी तसेच दिसण्यावरून खूप बोलले गेले आहे. माझ्यावर सतत टीका होत होती पण कुठेही मला माझ्या अभिनय कौशल्यासाठी कोणी विचारले नाही."


राजकुमार हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथील विद्यार्थी होता आणि तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल त्याला कोणत्या प्रकारच्या रिजेक्शनचा सामना करावा लागला याबद्दल त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, “मला बर्‍याच गोष्टी सांगण्यात आल्या. तू पुरेसा उंच नाहीस, तुझी शरीरय़ष्टी बरोबर नाही, तुझ्या भुवया वाईट दिसतात, त्या शेपमध्ये नाही. खूप विचित्र गोष्टी मी सहन केल्या होत्या पण अभिनयाचे काय तो कोणाला हवाय का? हे विचारल्यावर मात्र मला कोणीच उत्तर द्यायचे नाही. दिबाकर बॅनर्जी यांनी पहिले कास्टिंग केले. मला आजही त्याचा आनंद आहे की त्यांनी माझ्यात त्यांनी ती उर्जी दिसली. "


मुंबईत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राजकुमारने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला की मी तर बिस्किटांच्या एका पॅकेटवरही जगलो आहे. माझ्या बँक अकांऊटमध्ये तरी 18 रुपये असायचे आणि मी एका पार्ले-जीच्या बिस्किटवर तीन रात्र काढली आहेत. मला फिल्म स्कूलमधले माझे मित्र होते ज्यांनी मला मदत केली. पण माझा कधीच प्लॅन बी नव्हता. मला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं. राजकुमार राव पुढे HIT: The First Case या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो सान्या मल्होत्रासोबत काम करत आहे.