नवी दिल्ली : अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फॅनी खान' या चित्रपटात राजकुमार राव देखील आहे. न्यूटन या चित्रपटात व्यस्त असलेल्या राजकुमार रावने नुकतेच 'फॅनी खान' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. ट्विट करून त्याने यासंदर्भातील माहिती दिली. "अद्भुत अनिल कपूर सरांसोबत फॅनी खानच्या सेटवरील पहिला दिवस. सेटवर मस्त ऊर्जा," असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करत आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा, क्रिअर्ज एंटरटेनमेंट आणि टी-सीरीज यांची निर्मिती असलेला हा चित्रपट डच फिल्म 'एवरीबडी इज फेमस'चा रिमेक आहे. या चित्रपटाला २००० मध्ये ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. 
हा चित्रपट १३ एप्रिल २०१८ मध्ये प्रदर्शित होईल. अलीकडेच राजकुमारचा 'न्यूटन' चित्रपट प्रदर्शित झाला आणि भारतातर्फे त्याला ऑस्करमध्ये नामांकन देखील मिळाले. 


राजकुमारचा 'बरेली की बर्फी' हा चित्रपट लोकप्रिय ठरल्यानंतर त्याचा 'शादी में जरूर आना' हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.