नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचा आगामी चित्रपट 'शादी में जरूर आना' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'बरेली की बर्फी', 'बहन होगी तेरी' आणि 'न्यूटन' या चित्रपटातून राजकुमारने प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत. हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. या चित्रपटात अभिनेत्री कृति खरबंदा  पहिल्यांदाच ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचा ट्रेलर रोमान्स आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील एका मध्यम वर्गीय कुटुंबाची आहे. चित्रपटात राजकुमार सत्येंद्र मिश्रा आणि कृति आरती शुल्का यांच्या देखील भूमिका आहेत. यात दोघांचे लग्न ठरते. पण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आरती लग्न करत नाही. वेळेची चक्र फिरतात आणि काही काळाने ते दोघे परत भेटतात. त्यानंतर राजकुमार पूर्ण बदलेला असतो आणि इथेच कथेत ट्विस्ट येतो. बाकी जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघायला हवा. 



सध्या राजकुमार फॅनी खान या चित्रपटाच्या शूटींग मध्ये व्यस्त आहे. यात अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय देखील आहेत.