मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. पत्रलेखाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं की, आज माझं लग्न झालं आहे. माझा प्रियकर, माझा क्राइम पार्टनर, माझं कुटुंब, माझा जीवनसाथी... गेल्या 11 वर्षांपासून माझा सगळ्यात चांगला मित्र! तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, राजकुमार रावने इंस्टाग्रामवर लिहिलंय की, “अखेर 11 वर्षांचं प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर, माझा सोलमेट, माझा चांगला मित्र, माझं कुटुंब, माझे सगळं काही आज लग्न झालं. आज मला तुझा नवरा पत्रलेखा म्हणण्यापेक्षा मोठा आनंद नाही. कायमचं... आणि नंतरही..."



दोघांची शनिवारी चंदीगडमध्ये एंगेजमेंट झाली. 2010 पासून एकत्र दिसणारे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी न्यू चंदीगड येथील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित केली. फिल्ममेकर फराह खान आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी पार्टीला हजेरी लावली होती. हे दोघं चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या 2014 मध्ये आलेल्या सिटीलाइट्स आणि ALTBalaji च्या Bose: Dead/Alive या चित्रपटात एकत्र दिसले होते.