मुंबई : ‘बाहुबली’ नंतर या सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली हे ‘महाभारत’ हा सिनेमा करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र, त्यांनी पहिल्यांदाच या प्रोजेक्टबाबत मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस.एस.राजमौली हे महाभारतावर आधारित सिनेमा करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यासोबत शाहरूखही महाभारतावर आधारित सिनेमा करणार असल्याची चर्चा झाली होती. पण आता एस.एस.राजमौली यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. राजमौली म्ह्णाले की, ‘ते याप्रकारच्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाहीयेत. आणि सद्या ते सुट्टीचा आनंद घेत आहेत’.
  
राजमौली यांनी आयएनएससोबत बोलताना सांगितले, ‘मी महाभारतावर सिनेमा करत नाहीये. मी फक्त इतकेच म्हणालो होतो की, महाभारतावर सिनेमा करणं माझं स्वप्न आहे. पण मी यावर काम करत नाहीये’.


एस.एस.राजमौली यांना ‘बाहुबली’नंतर मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या दोन्ही सिनेमांनी ९०० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली. त्यामुळे आता ते कोणता सिनेमा घेऊन येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.